Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्कराला शिवाजीनगर पोलिसांनी पकडून साडेचार किलो गांजा केला जप्त
पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थांची विक्री करणार्यासाठी आलेल्या तस्कराला शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून साडेचार किलो गांजा जप्त केला आहे.
राहुल सदाशिव कांबळे Rahul Sadashiv Kamble (वय २८, रा. शेलारवाडी स्टेशन, तळेगाव दाभाडे) असे या तस्कराचे नाव आहे. त्याने हा गांजा हैदर शफान इराणी याच्याकडून आणल्याचे तो सांगत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांचे सहकारी हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव व श्रीकांत मखरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण शिवाजीनगर येथील रेल्वे मार्गाजवळील भैय्यावाडीतील नाल्याजवळ झुडपात बसून गांजा विक्री करीत आहेत. या खात्रीशीर बातमी वरुन पोलीस पथकाने तेथे जाऊन राहुल कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त पी आर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, दीपक रोमाडे, श्रीकांत मखरे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे.
