Pune Crime News | फुलचंद पानात नशेकरीता वापरत असलेला मादक पदार्थ विक्री करीता आणलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Shivajinagar Police arrests accused for selling drugs used for intoxicating in Phulchand Pan

पुणे : Pune Crime News | फुलचंद पानामध्ये नशेकरीता अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा वापर करण्यात येऊ लागला आहे. असा मादक पदाथार्ची विक्री करण्याकरीता आलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

विष्णु रामरतन गुप्ता Vishnu Ramratan Gupta (रा. पिंपरी चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे़. मोटारटेम्पोमध्ये ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांच्या बंट्याच्या गोळ्यांची पाकिटे असलेल्या गोण्या मोटार टेम्पोसह जप्त केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पानांमध्ये किक बसण्यासाठी मादक पदार्थ तयार करणार्‍या मुळशी तालुक्यातील कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठा माल पकडला होता.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक २८ एप्रिल रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फर्ग्युसन रोडवरील दिनदयाल हॉस्पिटल जवळील निर्जन रस्त्यावर बराच वेळापासून एक मोटार टेम्पो संशयास्पदस्थितीत उभा आहे. या माहितीबरोबर तपास पथक ते गेले. टेम्पोच्या पाठीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडून खात्री करण्यासाठी आतमध्ये पाहिले असता त्यात प्रतिबंधित अशा बंट्यांच्या गोळ्यांची पाकिटे असलेल्या गोण्या आढळून आल्या.

पोलिसांनी केलेल्या तपासात या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या बंट्यांच्या गोळया या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देखील वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंदक्रांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार सचिन जाधव, पोलीस हवालदार महावीर बलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, मोहिते, दीपक रोमाडे, पोलीस अंमलदार श्रीकांत मखरे यांनी केली आहे.

You may have missed