Pune Crime News | गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी गणेशोत्सवात 5 महिलांचे दागिने लांबविले; शनिवारवाडा, बाबु गेनू मंडळ, दगडूशेठ हलवाई मंडळाजवळील घटना
पुणे : Pune Crime News | गणेशोत्सवात मंडळाचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. या ५ घटना शनिवारवाडा, बाबु गेनू मंडळ, दगडूशेठ हलवाई मंडळ परिसरात घडल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आले. याबाबत कोथरूड मधील एका २७ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाड्याजवळ विविध वस्तुंचे विक्री करणारे तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत. महिला रविवारी २० सप्टेंबर रोजी खरेदी करत होती. त्या वेळी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ३८ हजारांचे दागिने लांबविण्यात आले. याच परिसरात आणखी एका महिलेचे दागिने लांबविण्यात आले.
दुसरी घटना छत्रपती शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात घडली. खडकी येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरण्यात आले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता घडली.
हुतात्मा बाबु गेनू तरुण मंडळाच्या उत्सव मंडपात बोपखेल येथील ३३ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील पावणेचार ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी चोरुन नेले. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
मुळच्या नांदेड येथील राहणार्या २६ वर्षाच्या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन कट करुन चोरुन नेले.
