Ambegaon Police News | गणेश विसर्जन मिरवणुकीत बाल वारकरी पथकाने घेतले लक्ष वेधून; आंबेगाव पोलिसांचा आदर्श उपक्रम

Ambegaon Police News | In the Ganesh immersion procession, the kids' Warkari team grabbed attention; an exemplary initiative by Ambegaon police

पुणे : Ambegaon Police News | गणेशोत्सवात डी जे लावण्यावरुन चर्चा झडत असताना आंबेगाव पोलिसांनी नवा आदर्श उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आंळदी येथील बाल वारकरी पथकाने सर्वांनी लक्ष वेधून घेतले. टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाचा जयघोष करत वेगवेगळ्या रचना सादर करत या बाल वारकर्‍यांनी उपस्थित नागरिकांची मने जिंकून घेतली.

गणेश विसर्जन मिरवणुक म्हणजे फिल्मी गाण्यांवर अचकट विचकट नाचणारे तरुण तरुणी असा प्रघात पडला आहे. या सर्व गोष्टींना फाटा देत आपली मिरवणुक आदर्श आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांचा मानस होता. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी खास आळंदीवरुन बाल वारकरी पथके बोलविण्यात आली होती. मिरवणुकीच्या सुरुवातीला टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा जयघोष करत हे बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्याचबरोबर ढोल ताशा या पारंपरिक वाद्याचे वादन करण्यात येत होते. खास पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीमध्ये श्री गणेश विराजमान झाले होते.

आंबेगाव पोलीस ठाणे ते शनीनगर चौक, टेल्को कॉलनी चौक, परत जांभुळवाडी रोड ते जांभुळवाडी तलाव दरम्यान काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या मिरवणुकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे)  चांगदेव सजगणे, सहायक पोलीस निरीक्षक  भोजलिंग दोडमिसे, फिरोज मुलानी, महेश नाईकवाडी, स्वाती देवधर, अश्विनी पाटील, प्रियांका गोरे, पोलीस उपनिरीक्षक  युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नीतीराज थोरात,  लक्ष्मण डोईफोडे, सुनीता काकुर्ले, पोलीस अंमलदार तसेच महिला दक्षता समिती सदस्य मोहल्ला कमिटी सदस्य, अल्पसंख्याक समिती, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

You may have missed