Pune Crime News | मारहाण करुन 29 लाखांची बॅग जबरी चोरी करुन नेल्याचा कामगाराचा बनाव 2 तासात पडला उघडा, कोंढवा पोलिसांनी साथीदारासह दोघांना अटक

Pune Crime News | The worker's plan of stealing a bag worth 29 lakh by assaulting someone was exposed in 2 hours, Kondhwa police arrested both him and his accomplice

पुणे : Pune Crime News |  स्टील व्यवसायातील वसुली करण्यासाठी पाठविलेल्या कामगाराने २९ लाख २० हजार रुपये वसुल करुन घेऊन येत असताना एनआयबीएम रोडवर आपल्याला मारहाण करुन पैशांची बॅग जबरी चोरुन नेल्याचा बनाव केला. कोंढवा पोलिसांनी कामगानाचा हा बनाव अवघ्या २ तासात उघड केला. कामगारासह दोघांना अटक करुन चोरी केलेली रोख रक्कम २९ लाख २० हजार रुपये व ३० हजारांचे दोन मोबाईल जप्त केले आहेत.

शाकीब अयुब मोमीन Shakib Ayub Momin (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि सुरेश बिचप्पा पुजारी Suresh Bichappa Pujari (वय ३०, रा. रामटेकडी, रामनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अरबाज इम्तीयाज जाफरानी (वय २६, रा. मोहम्मदवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचा जाफरानी स्टील यार्ड नावाने हांडेवाडी येथे स्टीलचे गोडावुन आहे. ते वेगवेगळ्या रिटेल व्यापारी यांना स्टील पुरवण्याचा व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना पुरवलेल्या स्टील बिलाची रक्कम जमा करण्याचे काम शकीब मोमीन हा मागील ७ वर्षापासून करीत आहेत.

तो २७ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील रिटेल दुकानदार यांना मागील ३ महिन्यांचे कालावधीमध्ये दिलेल्या स्टील बिलाची रक्कम वसूल करण्यासाठी गेला होता. दिवसभर त्याच्याशी संपर्कात फिर्यादी होते. त्याने पार्टींकडून २९ लाख २० हजार रुपये रक्कम जमा झाली असल्याचा मेसेज केला. त्याला गोडावुनला येऊन पैसे जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अनोळखी नंबरवरुन शाकीब मोमीन याने फोन करुन ‘‘एनआयबीएम रोडपर एक आदमीने रास्ते मे मेरेको अडाके मारके, पैसे का बॅग और मेरे मोबाईल लेके भाग गया है,’’असे सांगितले. ते तातडीने एनआयबीएम रोडवर गेले. त्यांनी शाकीब मोमीन याला घेऊन तक्रार करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात नेले.

कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेथे शाकीब मोमीन याच्याबरोबर असा काही प्रसंग घडला असल्याचे दिसून आले नाही. तेव्हा पोलिसांना शाकीब याच्यावर संशय आला. त्यांनी शाकीब मोमीनकडे कसुन चौकशी केली. तेव्हा त्याने फर्मची स्टील बिलाची जमा झालेली एकूण २९ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम त्याचा साथीदार सुरज पुजारी याच्याशी संगनमत करुन त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने लुटल्याचा बनाव करुन फिर्यादी यांना फोन केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलीस शाकीब मोमीन याला घेऊन सुरेश पुजारी याच्या रामटेकडी येथील घरी गेले. तेथे सुरज हा चोरी केलेल्या रक्कमेच्या बॅगेसह मिळून आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, अमोल हिरवे, केशव हिरवे, पोलीस अंमलदार अमित सूर्यवंशी, राहुल रासगे, रियाज पटेल, रवी जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, प्रशांत खाडे, रशिद शेख, शाहिद रजपूत, विशाल मेमाणे, शरद वाकसे, शेलार, ओंकार शेटे यांनी केली आहे.

You may have missed