Pune Crime News | ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Pune Crime News | Three suffocated to death while cleaning drainage; Unfortunate incident in Purandar taluka

पुणे : Pune Crime News |  पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून ड्रेनेज टाकी स्वच्छ करताना तिघा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये पिंटू राजेश प्रसाद (वय २३), व्यास सोहम कुमार (वय २२) आणि गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६) यांचा समावेश आहे. हे तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एक कामगार ड्रेनेज टाकीत स्वच्छतेसाठी उतरला होता. तो बराच वेळ वर न आल्याने दुसरा कामगार त्याच्या मदतीसाठी खाली उतरला. त्यानंतर दोघेही वर आले नाहीत, म्हणून तिसऱ्या कामगारानेही टाकीत प्रवेश केला. मात्र तिघेही बाहेर न आल्याने आजूबाजूच्या लोकांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने टाकीवरील स्लॅब फोडून त्यांना बाहेर काढले.

तिघांना तत्काळ जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. टाकीत साचलेल्या विषारी गॅसमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती जेजुरी पोलिसांकडून देण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी कसोदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, आझाद पाटील, गणेश खरात, प्रशांत शिंदे, संतोष विभुते, मयुरी नलावडे, प्रतिक्षा पानसरे, सुवर्णा धुमाळ यांनी केली आहे.

You may have missed