Pune Crime News | मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने केलेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कारवाई न झाल्याने गुंडांचा हैदोस; दोघा तरुणांना टोळक्यांनी केली बेदम मारहाण
पुणे : Pune Crime News | मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारणार्या तरुणाला गुंडाने आपल्या साथीदारांना घेऊन तरुणाला मारहाण केली. त्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल तर केला पण, तातडीने कोणतीच हालचाल न केल्याने याच गुंडांच्या टोळक्याने आणखी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सतीश् शहाजी पवार (वय ४०, रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओंकार दादु मिसाळ Omkar Dadu Misal (वय २३, रा. इंदिरा वसाहत, औंध) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश पवार हे सकाळनगर गेट समोर १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता काम करत होते. त्यावेळी ओंकार दादु मिसाळ व त्याचे तीन साथीदार त्यांना दिसले. त्यांनी ओंकार मिसाळ याला दुपारी बहिणीला का मारले, असे विचारले. त्यावरुन ओंकार मिसाळ हा म्हणाला की, तू कोण मला विचारणाा, असे बोलून शिवीगाळ केली़ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याने त्याचे हातामध्ये दगड घेऊन सतीश पवार यांच्या डोक्यात मारहाण केली. त्याच्या तिघा साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा चतु:श्रृंगी पोलिसांनी तातडीने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला. त्यानंतरही या गुंडांचा धुडगुस सुरु राहिला.
