Pune Crime News | आरडाओरडा करणार्यांना जाब विचारल्याने तरुणावर शस्त्राने केले वार; दहशत माजविणार्या टोळक्यांवर गुन्हा दाखल, शोएब रशीद कुरेशीला अटक
पुणे : Pune Crime News | आरडाओरडा केल्याने टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. टोळक्याने शस्त्रे उगारून दहशत माजवली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली.
उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शोएब रशीद कुरेशी Shoaib Rashid Qureshi (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. कुरेशीबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना येरवड्यातील पंचशीलनगरमधील दयावान समाज समोर १४ जून रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश गायकवाड आणि त्यांचे मित्र हे येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात थांबले होते. त्या वेळी आरोपी कुरेशी आणि त्याचे साथीदार तेथे आरडाओरडा करत होते. गायकवाड यांनी टोळक्याला आरडाओरडा का करता, असे विचारले. या कारणावरुन कुरेशी आणि साथीदारांनी गायकवाड आणि त्यांच्या बरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ करुन मारहाण केली. गायकवाड यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
पसार झालेल्या कुरेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे़ पोलीस उपनिरीक्षक विशाल माने तपास करत आहेत.
