Pune Crime News | बहिणीचा विवाह ठरविल्याच्या कारणावरुन टवाळखोरांनी भावाला, भावी नवरदेवाला मारहाण करुन जीवे मारण्याचा केला प्रयत्न

Pune Crime News | Thugs tried to kill brother, future groom by beating them up over sister's marriage

पुणे : Pune Crime News |  बहिणीचा विवाह ठरविल्याने होणार्‍या भावी नवरदेवाला मारहाण केले. त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावाला टवाळखोरांनी इसको अब खत्म कर देंगे असे म्हणून सिमेंटच्या गट्टुने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत दानिश आरिफ शेख (वय १८, रा. मंजील गल्ली, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरज ऊर्फ आसीफ शेख (वय २१), रामा दुर्गाअण्णा चौधरी (वय २५, दोघे रा. मुन्ना चाळ, मंजील  गल्ली, नेहरुनगर) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार शहाबाज ऊर्फ टिपू शहा (वय ३०,  रा. मंजील गल्ली, नेहरुननगर, पिंपरी), ईशाद शहा (वय ३२, रा. भोसरी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात १४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दानिश शेख याच्या बहिणीचा विवाह फरहान अकबर शेख यांच्याबरोबर निश्चित करण्यात आला आहे. फरहान शेख हे संतोषी माता चौकात आले असताना आसीफ शेख व रामा चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करुन हाताबुक्क्यांनी मारहाण करुन तेथून पळून गेले. त्यानंतर रात्री पावणे बारा वाजता नेहरुननगर येथील पवार पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या बालाजी ट्रेडर्स दुकानासमोर चौघांनी फिर्यादी व त्यांचे वडिलांच्या अंगावर धावून आले. शिवीगाळ करुन दोघांना मारहाण केली. ईशाद शहा याने दानिश शेख यांना पकडून खाली पडले. शहाबाज शहा याने रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टु उचलून इसको अब खत्म कर देंगे, असे म्हणून सिमेंटचा गट्टुने फिर्यादीच्या चेहर्‍यावर जोराने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक मनोज पांडे तपास करीत आहेत.

You may have missed