Pune Crime News | लंडनमधील नागरिकासह 5 गुंतवणुकदारांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवुन अडीच कोटींना घातला गंडा; इस्टेट एजंटावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Tricked investors, including a London citizen, into investing in real estate and swindled them out of 2.5 crores

पुणे : Pune Crime News | मुळचे नागपूरचे राहणारे सध्या लंडन येथील व्यावसायिकासह रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवुन त्यांच्यासह ५ गुंतवणुकदारांची २ कोटी ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत जितेंद्र अर्जुनदास मुलचंदानी (वय ४३, रा. जरीपटका, नागपूर, सध्या लंडन) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदित्य भारत गायकवाड Aditya Bharat Gaikwad (वय ३३, रा. आदित्य बिल्डिंग, सुनितानगर, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील मुंबई बंगलोर महामार्गावरील कदम प्लाझा येथील कार्यालयात जुलै २०२३ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या लंडन येथे रहात असून ते इंजिनिअर आहेत. त्यांचे भाऊ वाघोली येथे राहत आहेत. आदित्य गायकवाड हा इस्टेट एजंट आहे. फिर्यादी यांच्या भावाने आदित्य गायकवाड याच्याकडे प्लॉटिंगमध्ये गुंतवणुक केली होती. आदिथ गायकवाड याने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर सुरुवातीला काही काळ परतावा दिला. त्यामुळे भावाचा विश्वास बसल्याने फिर्यादी यांनीही त्यांच्याकडे गुंतवणुक केली.

त्यांच्याबरोबरच अन्य ४ जणांनीही त्यांच्याकडे गुंतवणुक केली होती. काही काळाने आदित्य गायकवाड याने परतावा देणे बंद केले. त्यानंतर त्यांनी आपले पैसे परत मागितल्यावर त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते लंडनहून पुण्यात आले. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये मे २०२६ मध्ये तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी केली. त्यानंतर आता ते लंडनहून परत पुण्यात आल्यानंतर त्यांची फिर्याद घेण्यात आली आहे. आदित्य गायकवाड याचा जागा विकसित करुन प्लॉटिंग करण्याचा व्यवसाय आहे. त्याने कदम प्लाझा येथील कार्यालय बंद केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे तपास करीत आहेत.

You may have missed