Pune Crime News | मौजमजेसाठी चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलाकडून वारजे माळवाडी पोलिसांनी 6 मोटारसायकली केल्या जप्त

Pune Crime News | Warje Malwadi Police seize 6 motorcycles from a minor who stole them for the thrill of it.

पुणे : Pune Crime News |  मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलाला पकडून वारजे माळवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना वारजेतील गणपती माथा येथे एका पांढर्‍या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीसह एक मुलगा थांबलेला दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी त्याच्याकडे दुचाकीविषयी चौकशी केल्यावर तो प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर  त्याने  ही दुचाकी वारजे येथील सह्याद्री शाळेसमोरुन चोरी केल्याचे कबूल केले. अधिक चौकशीत त्याने आणखी दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २, अंलकार पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. मौजमजेसाठी त्याने ही वाहने चोरल्याचे सांगितले. तीन वाहनांची ओळख पटायची आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर, निखील तांगडे यांनी केली आहे.