Pune Crime News | सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणीची 5 लाखांची फसवणूक; बारामती, सासवडच्या दोघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणीकडून ५ लाख १७ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

देवानंद साठे (रा. सासवड) आणि राजेंद्र शिरसाट (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २३ फेब्रुवारी २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. याबाबत सिंहगड रोड येथे राहणार्‍या एका ३१ वर्षाच्या तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हिच्या आईची देवानंद साठे याच्याशी ओळख होती. साठे याने राजेंद्र शिरसाट हा सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्यावरुन त्यांनी राजेंद्र शिरसाट याची भेट घेतली. त्याने नोकरी लावून देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख १७ हजार रुपये घेतले. परंतु, त्यांना कोणतीही सरकारी नोकरी लावली नाही. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. परंतु, त्यांनी पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांनी गेल्या वर्षी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची आता पोलिसांनी दखल घेऊन फिर्याद दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करीत आहेत.

You may have missed