Pune Crime News | दिल्लीतील मॉडेलिंग करणार्‍या तरुणींकडून पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेण्याच्या रॅकेटचा भांडाफोड; २ तरुणींची सुटका, चार एजंटांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुण्यातील हॉटेल क्राऊन प्लाझा या संगमवाडी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींना पकडले. एजंटद्वारे त्या दिल्लीहून येथे आल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांना येथे पाठविणार्‍या ४ एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विकवे ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४, सर्व रा. आसाम) आणि त्यांचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संगमवाडी येथील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे एजंटद्वारे तरुणींकडून वेश्या  व्यवसाय करुन घेत असल्याबाबतची गोपनीय बातमी प्राप्त झाली आहे. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहकाच्या सहाय्याने बातमीच खात्री करण्यात आली. त्यानंतर हॉटेल क्राऊन प्लाझा येथे अचानक छापा टाकून हॉटेलमध्ये वेश्यागमनाकरीता आणलेल्या २ परराज्यातील तरुणींना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्या दिल्लीतील राहणार्‍या असून मॉडेलिंग क्षेत्रात तसेच फोटो मॉडेल म्हणून काम करत असल्याचे सांगितले. यासाठी त्या दिल्लीहून पुण्यात आल्या होत्या.  

ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन , सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक सोनाली जगदाळे -साठे, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, सुरेखा आंधळे, मनिषा वायसे, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, फराह पठाण, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे यांनी केली आहे.

You may have missed