Pune Ganeshotsav | भक्तीच्या ‘चरणस्पर्शा’तून सौरऊर्जेला हातभार ! विक्रम सोलरची पुण्यात ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ मोहीम; गरजू गाव व शाळांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा उपक्रम

Pune Ganeshotsav | A boost for solar energy through the ‘touch of devotion’! Vikram Solar launches the ‘Majha Bappa, Majhi Urja’ (My Bappa, My Energy) campaign in Pune; an initiative to set up solar energy projects for needy villages and schools.

पुणे : Pune Ganeshotsav | गणेशोत्सवातील भक्तीला सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छ ऊर्जेची जोड देत विक्रम सोलर लिमिटेडने पुण्यात ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ ही अभिनव मोहीम सुरू केली आहे. भक्तांचा बाप्पाच्या चरणांशी होणारा प्रत्येक स्पर्श ‘ऊर्जा पॉईंट्स’मध्ये रूपांतरित होणार असून, या माध्यमातून गरजू ग्रामसमूह किंवा शाळेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास हातभार लावला जाणार आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धा, एकोपा आणि सामूहिक सहभागाचा उत्सव मानला जातो. याच भावनेला अक्षय ऊर्जेची जोड देत विक्रम सोलरने भक्तीचा सामाजिक प्रभाव निर्माण करणारा हा उपक्रम राबविला आहे. या मोहिमेचा शुभारंभ टिळक रस्त्यावरील शेंडगे वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे करण्यात आला.

या मोहिमेअंतर्गत दोन ‘सोलर एक्सपिरियन्स व्हॅन’ पुण्यातील विविध भागांत फिरत असून, भक्तांना बाप्पाच्या चरणांना स्पर्श करण्याचे आमंत्रण दिले जात आहे. भक्ताने चरणस्पर्श करताच बाप्पाभोवती उभारलेले सौर ‘ऊर्जामंडल’ प्रकाशमान होते. भक्तीचे रूपांतर अक्षय ऊर्जेच्या योगदानात कसे होऊ शकते, याचा अनुभव या माध्यमातून प्रतिकात्मक पद्धतीने घेता येतो.

बाप्पासोबत भक्तांचा प्रत्येक भक्तिमय संवाद ‘ऊर्जा पॉईंट्स’ निर्माण करतो. गणेश मंडळे तसेच सोलर एक्सपिरियन्स व्हॅन्समधून जमा होणारे हे पॉईंट्स एकत्रित करून निवडलेल्या ग्रामसमूह किंवा शाळेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या उपक्रमाला हातभार लावला जाणार आहे.

अक्षय ऊर्जा ही केवळ पारंपरिक वापरापुरती मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचावी, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतानाच लोकसहभागातून दीर्घकालीन सामाजिक परिणाम साधण्याचा प्रयत्न विक्रम सोलरने केला आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात निर्माण झालेली भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा सणानंतरही सामाजिक उपयोगाच्या रूपाने पुढे सुरू राहणार आहे.

विक्रम सोलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) समीर नागपाल म्हणाले, “गणेशोत्सव हा श्रद्धा, एकत्र येणे आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी व्यक्त करण्याचा उत्सव आहे. स्वच्छ ऊर्जा ही प्रत्येकासाठी अधिक शाश्वत भविष्य घडविण्याशी जोडलेली आहे. ‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ या मोहिमेतून आम्ही या दोन्ही भावनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक चरणस्पर्श हा भक्तीचा क्षण असला, तरी त्यातून एखाद्या गावाला किंवा शाळेला सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्यास हातभार लागू शकतो. वैयक्तिक भक्तीच्या क्षणांचे सामूहिक परिणामात रूपांतर करणे आणि अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून बाप्पाचा प्रकाश समुदायांपर्यंत पोहोचवणे, हीच आमच्यासाठी ‘क्लायमेट फॉर चेंज’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची दिशा आहे.”

‘माझा बाप्पा, माझी ऊर्जा’ मोहिमेतून गणेशोत्सवादरम्यान स्वच्छ ऊर्जा आणि तिच्या सामाजिक उपयोगाबाबत जनजागृती करण्याचा विक्रम सोलरचा प्रयत्न आहे. श्रद्धा, लोकसहभाग आणि अक्षय ऊर्जा यांचा संगम घडवून दीर्घकालीन सामाजिक परिणाम निर्माण करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

ही मोहीम विक्रम सोलरच्या ‘सिक्सेस फॉर सोलर’ (Sixes for Solar) या उपक्रमाच्या संकल्पनेलाही पुढे नेणारी आहे. जनसामान्यांना एकत्र आणणाऱ्या आनंदाच्या क्षणांचे रूपांतर सौरऊर्जेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याच्या संधीमध्ये करण्याची या उपक्रमामागील संकल्पना आहे.

You may have missed