Pune Kondhwa Crime News | पुणे : कोंढव्यात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेले तिघे ताब्यात; 2.59 लाखांचे एमडी जप्त

Pune Kondhwa Crime News | Pune: Three people caught in Kondhwa for selling mephedrone; MD worth 2.59 lakh seized

पुणे : Pune Kondhwa Crime News | कोंढवा परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी आल्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी पथकाने तिघांना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 58.14 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत 2 लाख 59 हजार 180 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताब्यात घेतलेल्यांची नावे तासीन आलम शेख Tasin Alam Shaikh (19), आयान समीर शेख Ayaan Sameer Shaikh (21) आणि आरिफ मुस्तफा शेख Arif Mustafa Shaikh (24) अशी असून, तिघेही कोंढवा येथील शिवनेरीनगर परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त केले. मेफेड्रोन आणि मोबाईलसह एकूण 2 लाख 89 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर रोजी लेन क्रमांक 23, पवार चाळ, शिवनेरीनगर येथे तिघेजण संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्यावर नजर ठेवली.

पोलीस जवळ येत असल्याचे लक्षात येताच तिघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले.

तिघांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

You may have missed