Pune News | अपूर्वा अमित आरगे यांना जिल्हास्तरीय गुणवंत कला शिक्षक पुरस्कार

Pune News | Apurva Amit Arge receives the district-level outstanding art teacher award

पुणे : Pune News | विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिशा देत विविध कलाविषयक उपक्रम राबविणाऱ्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, पुणे येथील अपूर्वा अमित आरगे यांना जिल्हास्तरीय गुणवंत कला शिक्षक पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी केलेले समर्पित कार्य, तसेच त्यांच्या कलाविषयक उपक्रमशीलतेची दखल घेत अपूर्वा आरगे यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

अश्विनीताई कदम, अध्यक्ष, पुणे जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

अपूर्वा आरगे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनीही त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या कलाक्षेत्रातील उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

You may have missed