Pune News | तुकाराम मुंढेंच्या ॲक्शनने खळबळ; पुण्यात चार ट्रक पनीर-खवा जप्त

Pune News | Tukaram Mundhe's action causes a stir; four trucks of paneer and khoya seized in Pune

पुणे : Pune News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई करत चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या खाद्यपदार्थांची गुणवत्ता तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणातील साठा नेमका कोठून आणण्यात आला, याचाही प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, पनीर, खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी प्रशासनाने तपासणी आणि देखरेख अधिक कडक केली आहे.

जप्त केलेल्या पदार्थांचा प्रयोगशाळा अहवाल आणि साठ्याच्या स्रोताबाबतचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

You may have missed