Pune Pimpri Crime News | दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; मामाने भाच्याच्या चेहऱ्यावर सिमेंटचा गड्डा फेकून केला जीवघेणा हल्ला

Pune Pimpri Crime News | Enraged over refusal to give money for alcohol, maternal uncle launches a life-threatening attack on nephew by hurling a cement block at his face.

पिंपरी : Pune Pimpri Crime News | दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मामाने आपल्या सख्ख्या भाच्यावर सिमेंटचा गड्डा फेकून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतील लालटोपी नगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (१६ जून) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रवींद्र अण्णा गायकवाड Ravindra Anna Gaikwad (वय ३७, रा. लालटोपी नगर, मोरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी युवक किरण उमेश गायकवाड (वय २२, रा. लालटोपी नगर, मोरवाडी) यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मामाने दारूसह इतर कारणांसाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो संतापला.

यानंतर रागाच्या भरात आरोपीने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गड्डा उचलून थेट भाच्याच्या चेहऱ्यावर फेकला. या हल्ल्यात किरण गायकवाड गंभीर जखमी झाले असून ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed