Pune Pimpri Crime News | दुबई, थायलंड येथे सायबर रॅकेट चालवणारा सांगलीच्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगाराला बँकाँक येथून रेड कॉर्नर नोटीसद्वारे अटक

Pune-Pimpri Crime News | Saurabh alias Ganesh Balaso Kale International cyber criminal Arrested

पुणे : Pune Pimpri Crime News | कोट्यवधीच्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात २०२४ पासून वॉटेड असलेला व दुबई, थायलंड येथून आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट चालविणार्‍या मुळच्या सांगलीच्या सायबर गुन्हेगाराला बँकॉंकला अटक करुन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी पुण्यात आणले आहे.

सौरभ ऊर्फ गणेश बाळासो काळे Saurabh alias Ganesh Balaso Kale (वय ३१, मुळ रा. सांगली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

ऑनलाईन टास्क देऊन पार्ट टाईम कामाच्या नावाखाली सौरभ काळे या लोकांची फसवणूक करत होता. देहुरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो भारतातून पळून दुबईला गेला होता. तेथून तो हे रॅकेट चालवित होता. त्याचबरोबर हिंजवडी पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने १८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूकीच्या नावाखाली २ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केली होती.

देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जून २०२४ मध्ये सायबर पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या १३ जणांकडे केलेल्या चौकशीत दीपक गाडे हा आरोपी दुबईला जाऊन सौरभ काळे याला भेटला होता. सौरभ काळे याला भारतातील विविध बँक खात्यांची माहिती (एटीएम, चेक बुक, अकाऊंट लिंक, मोबाईल नंबर, इंटरनेट बँकिंग आय डी, पासवर्ड) पाठवुन त्याबदल्यात पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले होते. सौरभ काळे याने सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी थेट दुबई येथे आपले मुख्य कार्यालय सुरु केले होते.

काळेची मोडस ऑपरेडी

सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासात सौरभ ऊर्फ गणेश काळे हा भारतातील वेगवेगळ्या व्यक्तींकडून बँक खाती मिळवायचा आणि त्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमधून आलेला पैसा स्वीकारण्यासाठी करत असे. आरोपी चीन आणि इतर परदेशी नागरिकांच्या थेट संपर्कात होता. त्याच्या मदतीने तो भारतीय नागरिकांना टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, आणि डिजिटल अरेस्ट अशा विविध क्लृत्या वापरुन लुटत होता व मोठा आर्थिक लाभ मिळवत होता.

गणेशा काळे हा हिंजवडी पोलीस ठाण्यातील २०२५ च्या गुन्ह्यांमध्येही सक्रीय असल्याचे भक्कम पुरावे मिळाले़ त्याच्या प्रत्यार्पण प्रस्ताव उपलब्ध पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला.  आरोपीच्या प्रोव्हिजनल अरेस्ट आणि प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर २०२४ मध्ये दुबई येथे कायदेशीर कारवाई सुरु होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये गणेश काळे हा दुबई सोडून बँकाँक येथे पळून गेल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.

सायबर पोलिसांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरवा करुन आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि एल ओसी जारी करुन घेतली.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून गणेश काळे हा थायलंडमधून दुसर्‍या देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकाँक विमानतळावर तेथील सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले. ११ जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, हवालदार हेमंत खरात आणि नितेश बिचेवार यांनी त्याचा ताबा घेतला. गणेश काळे याला देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक केली आहे.

गणेश काळे याच्या अटकेने देहूरोड, हिंजवडी आणि सायबर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल झाली आहे. याशिवाय नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई, मालवणी पोलीस ठाणे, मुंबई, सायबरबाद पोलीस ठाण्यातील २ गुन्हे असे एकूण चार गुन्हे उघडकीस येण्याच मदत झाली आहे.

ही उल्लोखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने केली आहे.

You may have missed