FIR On Pritam Khandve | खराडी येथे जागेच्या वादातून नगरसेविकेच्या पतीने कामगाराला केली बेदम मारहाण, खराडी पोलिसांनी  प्रितम प्रतापराव खांदवे यांच्यासह केला 8 जणांवर गुन्हा दाखल

FIR Against Pritam Khandve | Corporator's husband Pritam Khandve brutally beats up a worker over a land dispute in Kharadi

पुणे : FIR On Pritam Khandve | जागेत येण्यास मनाई केली असताना जेसीबीसह येऊन कामगाराच्या डोक्यात दगडाने व छातीवर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्या प्रकरणी खराडी पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेविका डॉ. श्रेयस खांदवे यांचे पती प्रितम प्रतापराव खांदवे Pritam Prataprao Khandve (वय ४१, रा. पाटील वस्ती, लोहगाव) असे त्यांचे नाव आहे. त्यांचे साथीदार पंकज संजय पाटोळे  (वय ३४, रा. लोहगाव वाघोली रोड), अभिषेक खडके (रा. वाघोली),  सुरज आणि जेसीबी चालक छोटू यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्ताफ अमजद शेख (वय २६, रा. आपले घर सोसायटी, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका डॉ. श्रेयस खांदवे यांचे पती प्रीतम प्रतापराव खांदवे यांनी जागा मालक पार्वती जीवन पाटील यांना १९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी काही गुंड प्रवृत्तीच्या महिलांना मारण्याची सुपारी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी पार्वती पाटील यांची सुटका केली होती. त्याबाबत पार्वती पाटील यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्या प्रकरणात तहसीलदार यांनी प्रितम प्रतापराव खांदवे यांना व त्यांच्या लोकांना सर्वे नंबर १३२/२ मध्ये येण्यास मनाईचे आदेश दिले होते. फिर्यादी हे पार्वती पाटील यांच्या जागेवर देखरेखीचे काम करतात. ३० मे रोजी रात्री पावणे बारा वाजता प्रितम प्रतापराव खांदेव, सुरज, जे सी बी चालक छोटू, पंकल पाटोळे, अभिषेक खडके व इतर ३ जण महालक्ष्मी लॉन्सच्या प्रवेशद्वारातून आत आले. त्यांना फिर्यादी यांनी थांबविले. आपण या ठिकाणी जे सी बी घेऊन का आला आहात. मी माझ्या  मालकीन पार्वती पाटील यांना फोन करुन विचारतो, नंतर तुमचे जे काय काम असेल ते करा, असे सांगितले. त्यावर पंकज पाटोळे याने जबरदस्तीने त्यांचा मोबाईल हिसकावुन घेतला.

त्यावेळी प्रितम प्रतापराव खांदवे याने सुरज व अभिषेक यांना सांगितले की, याला उचला व चांगला मार द्या, असे बोलले. पंकज पाटोळे याने त्यांच्या डोक्यात दगड  मारुन व छातीवर लोखंडी शस्त्राने मारुन दुखापत केली. त्यांच्या डोक्यातून व छातीतून रक्तस्त्राव होऊ लागला. अभिषेक खडके व सुरज यांनी पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रितम प्रतापराव खांदवे याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेऊन वॉचमन केबिनमध्ये शिरले. त्यांनी मालकीन पार्वती पाटील यांना कळविले.

खराडी पोलिसांनी येऊन त्यांची सुटका केली. पोलीस हवालदार संतोष म्हेत्रे तपास करीत आहेत.  

You may have missed