Pune Crime News | रिक्षाचालकाला मारहाण करुन मोबाईल व रिक्षा जबरदस्तीने चोरुन नेणार्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | रिक्षाचालका अडवुन मारहाण करुन त्याचा मोबाईल व खिशातील रोकड तसेच रिक्षा जबरदस्तीने चोरुन नेणार्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
किरण एडबा झोंबाडे Kiran Edba Zhombade (वय २०, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), पंकज सुभाष पवार Pankaj Subhash Pawar (वय २१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) आणि कुमार बाळकृष्ण खुडे Kumar Balkrishna Khude (वय ३०, रा. जागडे चाळ, अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रिक्षाचालक हे रिक्षा घेऊन १२ जून रोजी पहाटे साडेतीन वाजता बिबवेवाडी येथून जात असताना दोन दुचाकीवरुन चौघे जण आले. त्यांनी रिक्षा अडवुन त्यांना जरबदस्तीने बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. रिक्षा घेऊन ते पळून गेले होते. बिबवेवाडीमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरामागे थांबलेल्या तिघांना पकडले. अधिक चौकशीत त्यांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रिक्षासह माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहुल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी व दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.
