Pune Traffic News | टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; पुणेकरांचे 152 तास ट्रॅफिकमध्ये वाया

Pune Traffic News | TomTom Traffic Index 2025: Pune ranks fifth in the world for traffic jams; Pune residents waste 152 hours in traffic

पुणे: Pune Traffic News | टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२५ नुसार जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुणे पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. अहवालानुसार, वर्षभरातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचे तब्बल १५२ तास वाया गेले.

पुण्यातील सरासरी वाहतूक कोंडीची पातळी ७१ टक्के नोंदवण्यात आली, तर वाहनांचा सरासरी वेग ताशी केवळ १८ किलोमीटर राहिला. वाहनचालकांना १५ मिनिटांत अवघे ४.५ किलोमीटर अंतर पार करता आले. दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २० सेकंद लागले.

सकाळच्या वर्दळीच्या वेळी दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी सुमारे ३८ मिनिटे १३ सेकंद, तर संध्याकाळच्या गर्दीत त्याच अंतरासाठी जवळपास ४१ मिनिटे ४० सेकंद लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०२५ मधील ऑगस्ट हा पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा महिना ठरला. या महिन्यात कोंडीची पातळी जवळपास ७९ टक्क्यांपर्यंत पोहोचली. १६ ऑक्टोबर हा शहरातील अत्यंत कोंडीचा दिवस ठरला. त्या दिवशी पुणेकरांना १५ मिनिटांत केवळ २.७ किलोमीटर अंतर पार करता आले.

या यादीत मेक्सिको सिटी प्रथम, बंगळुरू दुसऱ्या, डब्लिन तिसऱ्या, लॉड्झ चौथ्या आणि पुणे पाचव्या क्रमांकावर आहे. या अहवालामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार, प्रभावी वाहतूक नियोजन आणि शहरातील वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रणाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

You may have missed