Pune Traffic Police | अपघात कमी करण्यासाठी वाहतूक शाखा राबविणार नियमभंग करणार्‍याविरुद्ध विशेष मोहिम; हेल्मेट, राँग साईड, ट्रिपल सीट जाणार्‍यांवर होणार कारवाई

Pune Traffic Police | To reduce accidents, the traffic department will run a special drive against rule violators; action will be taken against those not wearing helmets, going the wrong way, or riding triple seats

पुणे : Pune Traffic Police |  झिरो फॅटालिटी कॉरिडोर अंतर्गत अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या प्रकल्पामध्ये पुणे शहराचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने वाहतूक नियमभंग केल्याने होत असलेल्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समवेत याबाबत नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी माहिती दिली. झिरो फॅटालिटी कॉरिडोर या प्रकल्पांतर्गत जेथे अधिक अपघात होतात अशा देशभरातील १०० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुण्याचा समावेश आहे. अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजनाबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, सेव्ह लाइफ फाऊंडेशन, रोड ट्रान्सपोट, आर टी ओ, आरोग्य विभाग अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली.

ज्या कॉरिडोरमध्ये अधिक अपघात होतात़ अशा १२ कॉरिडोरमध्ये उपाय योजना करण्यात येत आहेत. पुणे शहरात २२ ब्लॅक स्पॉट आहेत. अपघात प्रवण क्षेत्रातील रोडचा अभ्यास करुन तेथील रोड डिझाईनमध्ये ही दोष आहेत का, याचा तपासणी करुन त्यानुसार सुधारणा करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील अपघात प्रवण भागातील अपघात  रोखण्यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राँग साईडने वाहन चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशा वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. अनेकदा अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये जखमींवर खासगी रुग्णालये उपचार करण्यासाठी दाखल करुन घेत नाही. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. खासगी रुग्णालयाने अशा जखमींवर तातडीने उपाय करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

पुणे शहरातील २२ ब्लॅक स्पॉट असलेल्या परिसरात वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

भष्ट्राचार होत असल्याने काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेकडील सर्व चालान करणारी मशीन बंद केली होती. ती आता सर्व पुन्हा कार्यन्वित करण्यात येणार आहे.

वाहतूक दंडाची रक्कम थकीत असण्याचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्ही मार्फत केल्या गेलेल्या वाहतूक नियमभंग दंड भरण्याचे प्रमाण खुप कमी आहे. अशा वाहनाची माहिती घेऊन त्यांच्याकडून पेंडिग दंड वसुल करण्याची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त असताना अनेक उपाय योजना केल्या होत्या़ त्याची माहिती त्यांनी या बैठकीत दिली.

वाहतूक नियमभंगाची कारवाई होत नसल्याने शहरात प्रामुख्याने दुचाकी वाहनचालकांकडून हेल्मेट वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. वाहतूक नियमभंगाची कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. जेणे करुन दुचाकी वाहनचालक हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढून अपघाती मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर राँग साईड, ट्रिपल सीट अशा वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्यात येणार आहे.

You may have missed