Raid On The Houz Commune | पुणे : ऐरोस्पेस मॉलमधील पबमध्ये पहाटेपर्यंत धिंगाणा घातल्याप्रकरणात पबमधील दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक, 63 तरुण व 26 तरुणी डान्स फ्लोअरवर होते नाचत (Video)

Raid on 'The Houz Commune' | Pune: Eight people, including two managers, arrested for creating a ruckus until the early hours at a pub in Aerospace Mall; 63 young men and 26 young women were dancing on the dance floor (Video).

पुणे : Raid On The Houz Commune | विमाननगर येथील ऐरोस्पेस मॉलमधील द हाऊझ कम्युन बार अ‍ॅन्ड इटररी हा पब पहाटेपर्यंत नियमबाह्य पद्धतीने सुरु ठेवल्याबद्दल पोलिसांनी २ मॅनेजरसह ८ जणांना अटक केली. तेथील १ लाख ६७ हजार रुपयांची दारु व ७५ हजार रुपयांची साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. (Aero Mall)

https://www.instagram.com/p/Dbz0TWapbsi

सुमित रोहीदास गोटे Sumit Rohidas Gote (वय ३०, रा. येरवडा), नूर हुसेन शेख Noor Hussain Shaikh (वय ३०, रा. विमाननगर), सोनाली विलास पंडित Sonali Vilas Pandit (वय ३२, रा. उंड्री), मंगेश उत्तम धिमधिमे Mangesh Uttama Dhimdhime (रा. धानोरी), अनिकेत निवृत्ती मांडकीकीर Aniket Nivrutti Mandkikir (वय २१, रा. धानोरी), सुनीता जैन वर्मा Sunita Jain Verma (वय २५, रा. लोहगाव), अनंत जगल गायकवाड Anant Jagal Gaikwad (वय ३१, रा. खडकी), शाहनूर अमीनुद्दीन काझी Shahnoor Aminuddin Kazi (वय ३५, रा. बिबवेवाडी ओटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विमाननगर येथील ऐरोस्पेस मॉलमधील द हाऊझ कम्युन बार अ‍ॅन्ड इटररी (The Houz Commune – Bar and Eatery) हा पब पहाटेपर्यंत सुरु असून यात अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गुन्हे शाखेला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या पबवर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी तेथे ६३ तरुण व २६ तरुणी असे ८९ ग्राहक डान्स फ्लोअरवर नाचत होते. त्यांना पहाटेपर्यंत मद्य पुरविले जात होते. पोलिसांनी या सर्व ग्राहकांची तपासणी केली. पबमधील १ लाख ६७ हजार रुपयांची दारु तसेच साऊंड सिस्टीम जप्त केली आहे.

शासनाने दिलेल्या वेळेचे व नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय सुरु ठेवणार्‍या हॉटेलमालकासह व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश माने, जीवन माने, तृप्ती सोनवणे यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पवार, जाधव, दिग्विजय चौगुले, पोलीस अंमलदार सरगर, चव्हाण, मंडलिक, नेवसे, तारु, तुपसुंदर, शिंदे, राठोड, खराडे, साबळे, केगले, रणपिसे, रेणुसे, राठोड, बांदल, शेलार यांनी केली आहे.

You may have missed