Hamida Sundke Death | स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांच्या पत्नी माजी नगरसेविका हमीदा सुंडके यांचे निधन

Hamida Sundke Death | Former councilor Hamida Sundke, wife of former standing committee chairman Anis Sundke, has passed away

पुणे : Hamida Sundke Death | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका हमीदा अनिस सुंडके यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६८ वर्षाच्या होत्या. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांच्या त्या पत्नी होत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यात २०१७ मध्ये कोंढवा येथून नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. सध्या त्या नाना पेठेतील घरी राहत होत्या. सायंकाळी त्यांना त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करुन त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्यावर रात्री उशिरा नाना पेठेतील मनुशा मस्जिद स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

You may have missed