Shirur Pune Crime News | पुणे : बनावट सोन्याच्या आधारे 18 लाखांचा घोटाळा; HDFC बँकेचा गोल्ड लोन व्हॅल्युअरसह 12 जणांवर गुन्हा, दोघांना अटक

Pune Crime News

पुणे : Shirur Pune Crime News |  बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून एचडीएफसी बँकेची तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एचडीएफसी बॅंकेची या प्रकरणात फसवणूक झाली असून, शैलेश लालासाहेब जाधव (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी बँकेच्या  वतीने फिर्याद दिली आहे. बँकेत गोल्ड लोन व्हॅल्युअर म्हणून काम करणारा संजय हिराचंद पंडीत Sanjay Hirachand Pandit (रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे) याच्यासह लक्ष्मण उर्फ लखन किसन वीर (Laxman alias Lakhan Kishan Veer) व बाजीराव सिताराम शेळके Bajirao Sitaram Shelke (दोघे रा. राजापूर, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर), मच्छिंद्र दिगंबर खैरनार Machhindra Digambar Khairnar (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे), प्रतिक दादा मांडगे Pratik Dada Mandge (रा. रांजणगाव मशिद, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर), किरण हौसराव सुरवसे Kiran Hausrao Suravase (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे), ऋषिकेश मधुकर देशमुख (Rishikesh Madhukar Deshmukh) व तन्मय नानासाहेब जगदाळे Tanmay Nanasaheb Jagdale (दोघे रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे), अभिषेक यशवंत जोंधळे (Abhishek Yashwant Jondhale) व दीपक नाना बोऱ्हाडे Deepak Nana Borhade (दोघे रा. शिरूर, जि. पुणे), मयुर रंगनाथ लंघे Mayur Ranganath Langhe (रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) आणि प्रवीण गवळी (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लखन वीर या मुख्य सूत्रधारासह मच्छिंद्र खैरनार याला अटक करण्यात आली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. वीर याला शुक्रवार (ता. २९) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, खैरनार याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सुमारे 17 लाख 76 हजार रुपयांचे कर्ज उचलले. मात्र मार्च 2026 मध्ये बँकेच्या वार्षिक तपासणी आणि ऑडिटदरम्यान गहाण ठेवलेले दागिने बनावट असल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान आरोपींनी बँकेच्या चौकशीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने बँकेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा केवळ फसवणुकीचा प्रकार नसून बँकिंग यंत्रणेत संगनमताने चालवण्यात आलेला मोठा घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत.

You may have missed