Pune Crime News | कोरेगाव पार्कमधील पॉर्श सोसायटीमधील फ्लॅटमध्ये सुरु होता परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय, 4 परदेशी तरुणींची सुटका

Pune Crime News | Prostitution business by foreign women was going on in a flat in Porsche Society in Koregaon Park, 4 foreign girls rescued

पुणे : Pune Crime News | कोरेगाव पार्क या पॉर्श परिसरातील सोसायटीमधील एका फ्लॅटला लॉज सारखे रुपांतरीत करुन तेथे परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने उघडकीस आणला आहे. या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणार्‍या ४ महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्‍याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली की कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड येथील लिबर्टी सोसायटीमधील अभिभा स्टे मधील फ्लॅटमध्ये परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक पाठविण्यात आले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी अभिभा स्टे येथील फ्लॅटवर २६ मे रोजी अचानक छापा टाकला. तेव्हा त्या फ्लॅटचे रुपांतर एखाद्या लॉजसारखे केलेले पोलिसांना दिसून आले. तेथे केनिया येथील चार परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे दिसून आले. या महिला गेल्या २ ते ३ महिन्यांपासून पुण्यात येथे रहात असल्याची माहिती मिळाली आहे. या परदेशी महिलांना ताब्यात घेऊन कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाइ अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, वैशाली खेडेकर, सुरेखा कांबळे, सुरेखा आंधळे यांनी केले आहे.

You may have missed