Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिरात तेजस्विनी महिला लेझीम पथकाकडून देवीची आगळी आराधना (Videos)

Shri Mahalaxmi Temple, Sarasbag | Unique worship of the Goddess by the Tejaswini Women's Lezim Troupe (Videos)

पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्यासमोर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे आणि शिवनेरीपासून रायगडापर्यंत आपल्या लेझीम कौशल्याचे प्रात्याक्षिक दाखविणार्‍या तेजस्विनी लेझीम पथकाने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आपली सेवा रुजू केली.

https://www.instagram.com/p/DecG-gPps3T

तेजस्विनी लेझीम पथकाने देवीच्या भक्ती गीतांवर लेझीमच्या तालबद्ध ठेक्यावर महिलांनी सादर केलेल्या उत्साहपूर्ण खेळामुळे मंदिर परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

https://www.instagram.com/p/Deb06kAppcF

ज्योती देशपांडे, श्रृती सुपेकर, श्रद्धा सोमण, श्वेता चव्हाण, प्राजक्ता घोरपडे, निकिता माने, लीना भार्या, अदिती पाटील, अश्विनी गायकवाड, शिल्पा जगताप यांनी लेझीमची प्रात्याक्षिके सादर केली.

https://www.instagram.com/p/DeduHhwpVQd

तेजस्विनी महिला लेझीम पथकाची स्थापना ज्योती देशपांडे, श्रृती सुपेकर यांनी २०२४ मध्ये केली. उत्सवांमध्ये डी जे चा वाढता गोंधळावर आपल्या कृतीतून उत्तर देण्याच्या कल्पनेतून या महिला लेझीम पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ते आपली प्रात्याक्षिके सादर करतात. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव, तसेच रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमात त्यांनी लेझीमची प्रात्याक्षिके सादर केली आहेत. हैदराबाद येथील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत आपली कला सादर केली होती. त्यांच्या या पथकात ४० महिला असून त्या आपला व्यवसाय, नोकरी, घरकाम सांभाळून लेझीम ही कला नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी काम करत आहेत.

https://www.instagram.com/p/DebZ2WTJz9b

You may have missed