Suraj Lokhande | सार्वजनिक जागा, कॅनॉल आणि रस्त्यांच्या कडेला राडारोडा टाकल्यास 10 हजारांचा दंड; वाहन पकडून देणाऱ्या नागरिकाला 5 हजारांचे बक्षीस

Suraj Lokhande | Fine of ₹10,000 for dumping debris in public spaces, canals, or along roadsides; reward of ₹5,000 for citizens who help apprehend the vehicle involved.

स्थायी समितीसमोर नगरसेवक सूरज लोखंडे यांचा प्रस्ताव; दिपाली डोख व गौरव घुले यांचे अनुमोदन

पुणे : Suraj Lokhande | शहरातील सार्वजनिक जागा,कॅनॉल च्या कडेला या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामाचा राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून आले.या घटना रोखण्यासाठी अशा वाहनमालकांवर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, त्याचबरोबर पुराव्यासह संबंधित वाहन पकडून देणाऱ्या नागरिकाला प्रति वाहन पाच हजार रुपयांचे बक्षीस द्यावे,असा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर नगरसेवक सूरज लोखंडे यांनी मांडला आहे.दिपाली संतोष डोख आणि गौरव गणेश घुले यांनी त्याला अनुमोदन दिले

पुणे शहर मागील वर्षात झपाटय़ाने वाढले असून मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाली आहे. ही बांधकाम होत असताना,तेथील दगड,विटा या सारखा राडारोडा सर्रासपणे कॅनॉल किंवा रस्त्याच्या कडेला टाकला जातो.यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे.त्याच बरोबर कॅनॉल मध्ये टाकलेल्या राडारोडामुळे पावसाचे पाणी अडून राहते आणि आसपासच्या भागात पाणी जाते. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.यावर प्रशासनातील कोणत्याही अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याचे आजवरच्या घटनामधून दिसून आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शहरातील सार्वजनिक जागा,कॅनॉल च्या कडेला या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामाचा राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून आले.या घटना रोखण्यासाठी अशा वाहनमालकांवर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करावी, त्याचबरोबर पुराव्यासह संबंधित वाहन पकडून देणाऱ्या नागरिकाला प्रति वाहन पाच हजार रुपयांचे बक्षीस द्यावे,असा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर नगरसेवक सूरज लोखंडे यांनी मांडला आहे.आता यावर स्थायी समिती काय निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

You may have missed