Thalapathy Vijay | थलपती विजय यांचा शपथविधी का रखडला? राज्यपालांचा निर्णय आणि ऐनवेळचा हायव्होल्टेज ड्रामा

Thalapathy Vijay | Why was Thalapathy Vijay's oath-taking ceremony delayed? Governor's decision and the high-voltage drama of the hour

चेन्नई :  Thalapathy Vijay | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय याने ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात केलेली एन्ट्री सध्या तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. केवळ अभिनेता म्हणून मर्यादित न राहता, विजयने आता पूर्णवेळ राजकारणी म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली असून, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी डीएमके (DMK) आणि प्रमुख विरोधी पक्ष अण्णा द्रमुक (AIADMK) समोर मोठे आव्हान उभे केले आहे.

विजयच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही केवळ एका पक्षाची स्थापना नव्हती, तर ती तमिळनाडूच्या पारंपारिक ‘द्रविडीयन’ राजकारणाला दिलेले एक नवीन वळण आहे. त्याने आपल्या भाषणांमधून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करत, राज्याला एक स्वच्छ आणि पारदर्शक पर्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. तमिळनाडूमध्ये एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्यासारख्या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी ज्याप्रमाणे राजकारणावर आपली पकड मिळवली होती, तसाच काहीसा करिश्मा विजयच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. विशेषतः राज्यातील तरुण वर्ग आणि नवमतदारांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ असून, हीच त्याची सर्वात मोठी ताकद मानली जात आहे.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटला नाही. थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेकडे सध्या ११६ आमदारांचा पाठिंबा आहे. मात्र अजूनही बहुमातासाठी २ आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. तर डाव्या पक्षांनीही विजय यांना पाठिंबा दिला. मात्र व्हीसीकेच्या समर्थनाशिवाय सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे व्हीसीके आज सकाळी टीव्हीकेला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेणार आहे.

विजय थलपती यांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर करत आहेत. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा विजय यांनी केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी राज्यपालांना दिला. मात्र असं असलं तरी राज्यपाल मात्र बहुमताच्या आकड्यावर अडून असल्याची माहिती आहे.

You may have missed