Tree Plantation In Pune | ‘एक पेड पुनित दादा के नाम’ अभियानांतर्गत वसुंधरा टेकडीवर वृक्षारोपण
पुणे : Tree Plantation In Pune | पुनित दादा बालन यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, २३ ऑगस्ट रोजी वसुंधरा टेकडी, बाणेर येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, गुडमॉर्निंग ग्रुप कात्रज आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड पुनित दादा के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
वसुंधरा अभियान, बाणेरच्या माध्यमातून २००६ पासून आजपर्यंत ६० हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या उपक्रमातून जैवविविधतेने समृद्ध जंगलाची निर्मिती करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित ‘वनश्री’ पुरस्काराने राज्यात तृतीय क्रमांकाने अभियानाचा गौरव करण्यात आला आहे.
या वृक्षारोपण उपक्रमास गुडमॉर्निंग ग्रुपचे सूर्यकांत कडू, अनिल उमरदंड, अनिल जगताप, संतोष लोहकरे, शिवाजीराव नवगिरे, वसुंधरा अभियानचे पांडुरंग भुजबळ तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
