Tulja Bhavani Temple | तुळजाभवानी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल; देणगी व सामान्य रांग एकाच ठिकाणाहून

Tulja Bhavani

सोलापूर : Tulja Bhavani Temple |  तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिर संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले असून, देणगी दर्शन आणि धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा आता एका ठिकाणी एकत्र करण्यात येणार आहेत. ही नवीन व्यवस्था १८ जूनपासून लागू करण्यात आली आहे.

नवीन नियमानुसार, ५०० रुपयांच्या देणगी दर्शन पासधारक आणि रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना मार्गे प्रवेश दिला जाईल. त्यानंतर कल्लोळ तीर्थाच्या बाजूने टोळभैरव पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावर त्यांना सोडण्यात येईल.

तसेच, २०० रुपयांच्या देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्कालीन प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावर प्रवेश देण्यात येईल.

यानंतर दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील भुयारी मार्गात ५०० रुपये, २०० रुपये देणगी दर्शन आणि धर्मदर्शनाच्या रांगा एकत्र करून सर्व भाविकांना समान पद्धतीने देवीचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर प्रशासनाने या नव्या व्यवस्थेमुळे दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

You may have missed