Chaturshringi Police News | सुस-पाषाण टेकडीवर नागालँडच्या विद्यार्थ्याला लुटणारे जेरबंद; चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी

Chaturshringi Police

पुणे : Chaturshringi Police News | सुस-पाषाण टेकडीवर (Sus Pashan Hills) सायकलिंग ट्रॅकिंगसाठी आलेल्या नागालँड येथील राहणार्‍या विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणार्‍या दोघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. (Arrest In Robbery Case)

https://www.instagram.com/reel/DAz6HUcpoq6/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

अंजिक्य अशोक बोबडे (वय १८, रा. गुरुकृपा बिल्डिंग, संत तुकाराम नगर, नवी सांगवी) आणि निखील बाबासाहेब डोंगरे (वय १८, रा. साकेत सोसायटी, आंबेडकर चौक, औंध) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. याबाबत पौजेंराई कामेई (वय १९, रा. गंगानगर, जुनी सांगवी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पौजेदाई कामेई हे नागालँड येथील राहणारे असून स्पायसर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सायकलिंग ट्रॅकिंगसाठी सुस -पाषाण रोडवर मित्रासह गेले होते. त्यावेळी चौघा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करुन त्यांच्याकडील दोन मोबाईल व इतर साहित्य असा २० हजार रुपयांचा माल चोरुन नेला होता.

https://www.instagram.com/p/DAx7iCDp7Kc

चतु:श्रृंगी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलिसांनी चौघांचा शोध घेऊन त्यांना पकडले. त्यांनी जबरदस्तीने काढून चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल, कोयता असा १ लाख २१ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

https://www.instagram.com/p/DAx0iMjpy-1

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी, विजयानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, श्रीधर शिर्के, किशारे दुशिंग, संदिप दुर्गे, विशाल शिर्के, पोलीस अंमलदार बाबासाहेब भांगले, प्रदिप खरात, श्रीकांत साबळे, प्रशांत गायकवाड यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAxqYVeJ39s

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Helicopter Crash In Bavdhan Pune | पुणे : बावधन येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्रीतम भारद्वाज, गिरीश पिलाई, परमजीत सिंग यांचा मृत्यु (Video)

Nana Patole On Amit Shah | ‘2024 मध्ये ते जिंकू शकत नाहीत मान्य केल्यामुळे…’,
अमित शहांच्या विधानाला काँग्रेकडून पलटवार; म्हणाले – ‘त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आल्याने…’

Chinchwad Assembly Constituency | चिंचवडमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर; इच्छुकांना डावलत तीन जणांची नावे पाठवली वरिष्ठांकडे

You may have missed