Pune Crime News | प्लॉटमध्ये गुंतवणूक करायला लावुन कॅम्पमधील डॉक्टरास घातला पावणेसात कोटींचा गंडा, 4 पेशंटविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सोलापूर व कर्जत येथील प्लॉटमध्ये १ कोटी ९१ लाख रुपये २०१३ मध्ये गुंतविण्यास भाग पाडून त्यांना दिलेले प्लॉट परस्पर दुसर्‍याला विक्री करुन एका कॅम्पमधील डॉक्टरांना त्यांच्याच पेशंटनी ६ कोटी ७५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत डॉ. जीवन ऊर्फ दशरथ सीताराम लाडी (वय ६०, रा. गुलमोहर अपार्टमेंट, इस्ट स्ट्रीट, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नरेश मोतीराम भरडे Naresh Motiram Bharde (वय ५२), मनिषा नरेश भरडे Manisha Naresh Bharde (वय ४६), रेश्मा अत्तार/हजीते (वय ३९), योगेश बबनराव पाटील Yogesh Babanrao Patil (वय ४५, सर्व रा. इक्सेलेन्स शेल्टरस प्राईड गेटवे, वीरभद्रनगर, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१३ पासून आजपर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ जीवन लाडी यांचे नरेश भरडे व त्याचे नातेवाईक, योगेश पाटील हे पेशंट आहेत. त्यांच्याकडे उपचारासाठी येत असताना त्यांची ओळख झाली. त्यांनी आम्ही जमिनी घेऊन त्याचे काही काळाने प्लॉट पाडून विक्री करतो. त्यात तुम्ही गुंतवणुक करा, असे डॉ. लाडी यांना सांगितले. सोलापूर व कर्जत येथे मोठा प्लॉट असून त्यांची कंपनी पैसे गुंतवुन घेतले. या पैशांतून प्लॉट खरेदी करतो व ज्यांनी पैसे गुंतविले, त्यांना चांगला परतावा नफा स्वरुपात देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. २ वर्षात मुद्दलासह १०० टक्के परतावा परत देणारी योजना असल्याचे सांगितले. त्यांनी २०१३ मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये १ कोटी ९१ लाख रुपयांची गुंतवणुक केली. त्यांच्या नावाने प्लॉट खरेदी केल्याची अलॉटमेंट पत्रेही त्यांना देण्यात आली. दोन वर्षानंतर त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

थोड्या दिवसात तुमचे काम होईल, असे सांगून त्यांना टाळाटाळ करु लागले. त्यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या नावाने जे प्लॉट घेतले होते. ते त्यांनी परस्पर विकून टाकले होते. त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केल्यावर तब्बल १२ वर्षानंतर २३ सप्टेंबर २०२५ रोजी ४ कोटी रुपये देण्याचे अ‍ॅग्रीमेंट केले. त्या पैकी त्यांनी डॉक्टरांना ५० लाख रुपये दिले. त्यानंतर मार्च, एप्रिल, जून आणि सप्टेंबर २०२५ मध्ये ३ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. ते बँकेत वटविण्याकरीता दिले असता ते चेक बाऊन्स  झाले. तेव्हा त्यांनी विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही पैसे वगैरे काही देणार नाही, तुला काय करायचे ते कर, आम्ही कोणालाही घाबरत नाही, अशी दमदाटी सुरु केली. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे तपास करीत आहेत.

You may have missed