Pune Crime News | मैने कल जो हुकुम दिया था, उसका क्या हो गया, सय्यदनगर मे हॉटेल चलाना नही क्या? हॉटेलचालकाला पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी उकळणार्‍या टिपू पठाणसह टोळीवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मोक्काच्या दोन्ही गुन्ह्यात लागोपाठ जामीन मिळाल्यानंतर आता गँगस्टर टिपू पठाण व त्याच्या टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापासून तो एका हॉटेलचालकाकडून दरमहा ५ हजार रुपयांची खंडणी उकळत होता.

याबाबत नवाज मोहमद तांबोळी (वय ५४, रा. गुलामअलीनगर, मोहमदवाडी) यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर), तन्वीर शकील शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), इरफान नासीर शेख (रा. हडपसर), अजित ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), सद्दाम सलीम पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) व इतर ३ ते ४ साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान घडला होता.

टिपू पठाण व त्याच्या टोळीवर जमीन बळकावून, ती भाड्याने देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या त्याच्या टोळीवर २ मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात न्यायालयाने टिपू पठाण याच्यासह ६ जणांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवाज तांबोळी यांचे मोहमदवाडी येथील गुलामअलीनगरमध्ये हॉटेल जमजम नावाने हॉटेल आहे. ते गेली ७ वर्षांपासून हॉटेल चालवित आहेत. सय्यदनगर भागात हॉटेल चांगल्याप्रकारे चालू लागल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या ओळखीचा तन्वीर शेख हा एके दिवशी त्यांच्या हॉटेलमध्ये आला. त्यांना म्हणाला की, ‘‘तुम्हारा धंदा अच्छा चल रहा है और इसका मुनाफा तुमे टिपू भाई को देना पडेगा, नही तो टिपू भाई तुम्हारा हॉटेल चलने नही देगे’’ अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर टिपू पठाणचे लोक भाईला खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देऊन निघून जात होते.

११ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी इम्रान अफजल शेख याच्या सोबत तन्वीर शकील शेख हॉटेलमध्ये आले. त्यांनी टिपू पठाण याला फोन लावला. फिर्यादीकडे दिला. तेव्हा समोरुन ‘‘मै टिपू भाई बोल रहा हू, मेरा अशरफ कुरेशी और मजर कुरेशी के साथ पार्टनरशिप मे मटण का दुकान खौला है, तुम्हारे हॉटेल के लिए मेरे आदमी से ही तुमको मटन लेना पडेगा, अगर नही लिया तो तुमको ५ हजार रुपये मेरे को देना पडगो’’ अशी खंडणीची मागणी केली. त्यानंतर तन्वीर याने टिपू भाई फोन मे जो बोला ओ समजा क्या, नही तो कल भाई के दरबार मे आने का, असा दम देऊन तन्वीर निघुन गेला.


दुसर्‍या दिवशी १२ जानेवारी रोजी सायंकाळी तन्वीर शेख हा हॉटेलवर येऊन टिपू भाईने ऑफिसमध्ये बोलावले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते टिपू पठाण याच्या ख्वाजा मंजिल येथील ऑफिसमध्ये भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी टिपू पठाण, तन्वीर शकील शेख, इरफान नासीर शेख, अजिम ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख, सद्दाम सलीम पठाण व त्यांचे इतर ३ ते ४ जण बसले होते. त्यांना पाहून टिपू पठाण याने टेबलाचे ड्राव्हरमधील पिस्टल काढून तो हातामध्ये घेऊन त्यांना म्हणाला, ‘‘ऐ क्या है पत्ता है क्या, मैने कल जो हुकुम दिया था उसका क्या हो गया, तुमको बहुत मस्ती आया क्या, सय्यदनगर मे हॉटेल चलाना नही क्या, मेरी बात नही मानी तो गोली से उडा दुंगा,’’ असे म्हणून त्यांना धमकाविले.

त्यावेळी इरफान नासीर शेख, अजिम शेख हे टिपू पठाण याला म्हणाले की, ऐ जमजम हॉटेल के मालिक बच्चे लोग को आपने हॉटेलमे बैठने अगर दारु पिने को मनाई करता है. त्यावेळी टिपू पठाण याने त्यांची कॉलर पकडून दम दिला की, ‘‘आजपासून आमचे मटण खरेदी करायला लागेल. आमच्या गँगला दरमहा ५ हजार रुपये खंडणी स्वरुपात द्यावे लागतील. आमच्या गँगमधील तन्वीर शेख, अजिम शेख, सद्दाम पठाण यापैकी कोणीही खंडणी मागण्यास तुझ्याकडे आला की त्याचेकडे ठरलेप्रमाणे ५ हजार रुपये देत जा. ’’ अशी धमकी दिली. त्यांनी मटन खरेदी करण्यास नकार दिला असता टिपू पठाण याने त्याच्या साथीदारांना याचे हात पाया तोडून टाका, असे सांगितले.

तेव्हा त्यांनी घाबरुन उद्यापासून अशरफ दस्तगीर कुरेशी व मजर दस्तगीर कुरेशी यांच्याकडून मटण माझ्या हॉटेलमध्ये चालु करतो, असे सांगितले. त्यावर टिपू पठाण म्हणाला की, आजचे ५ हजार रुपये मला द्यावे लागतील, नाही तर तुला सुट्टी नाही, त्यावेळी त्यांनी घाबरुन टिपू पठाण याला ५ हजार रुपये दिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पासून अशरफ दस्तगीर कुरेशी व मजर कुरेशी यांच्या दुकानातून मटन घेण्यास चालू केले. त्यानंतर टिपू पठाण याच्या गँगमधील लोक त्यांच्या हॉटेलवर रात्री अपरात्री येऊन पैसे न देता जबरदस्तीने हॉटेलमध्ये जेवण करुन व पैसे न देता जेवण पार्सल घेऊन जायचे व टिपू पठाण याने खंडणी स्वरुपात मागितलेले दरमहा ५ हजार रुपये घेऊन जात होते. हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने आतपर्यंत तक्रार दिली नसल्याचे नवाज तांबोळी यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

You may have missed