Pune Crime News | मेंढ्यांच्या कळपामुळे जाण्यास जागा न मिळाल्याने कारचालकाने रॉड फेकून मारल्याने मेंढपालाचा हात फ्रॅक्चर, वारजे मधील सर्विस रोडवरील घटना

Pune Crime News

पुणे: Pune Crime News | पुरंदरमधील मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन जात असताना गाडीला मेंढ्या आडव्या गेल्याने कारचालकाने लोखंडी रॉड फेकून मारल्याने मेंढपालाचा हात फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत संतोष संपत कोकरे (वय २८, रा. जाधववाडी, पुरंदर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कारचालक साजन उर्फ शाहरुख इम्माउद्दीन कासार Sajan alias Shahrukh Immauddin Kasar (वय २५, रा. साई सायाजीनगर, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष कोकरे, त्यांचे वडील, पत्नी हे मेंढ्यांचा कळप घेऊन सर्विस रोडने ११ नोव्हेंबर रोजी दुपारी जात होते. शोभापुरम सोसायटी कमानीचे समोर मेंढ्याचा कळप कारच्या समोरून आडवा गेला . त्यामुळे कारचालक त्यांच्या वडिलांशी हुज्जत घालत होता. तेव्हा संतोष हे त्याला म्हणाले, कि मुकी जनावरे आहेत. त्यांच्या चालण्याने ट्राफिक होणार. यावरून त्यांच्या वाद वाढला. तेव्हा कारचालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते कळप घेऊन पुढे जात असताना कारचालकाने लोखंडी रॉड फेकून मारला. तो संतोष यांच्या हाताला लागला. ११२ वर फोन  केल्यावर पोलीस आले, त्यांनी संतोष यांना हॉस्पिटल मध्ये नेले. तेथे संतोष यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम तपास करत आहे.

You may have missed