Palghar News | दुर्दैवी! पालघरमध्ये बंद दगड खाणीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
पालघर : Palghar News | जिल्ह्यातील मस्तान नाका परिसरात बंद दगड खाणीतील पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिग्नेश विजय पवार (वय ८ वर्षे) आणि आयुष मुकेश पवार (वय १५ वर्षे) हे मुले त्यांच्या मित्रांसह पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्यामुळे दोघे बुडून गेले.
घटना स्थानिक मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळील मस्तान नाका उड्डाणपुलाजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जिग्नेश याचा मृतदेह ताबडतोब सापडला, तर आयुषचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पोलिसांनी तपास सुरू केला असून, घटनास्थळी पाहणी करून पुढील कारवाई सुरू केली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवून बचावकार्य केले. ही घटना परिसरात शोककळा पसरवणारी ठरली असून, भविष्यात अशा अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची मागणी वाढली आहे.
