Pune Crime News | घरगुती गॅसचा काळा बाजार करणार्‍या दुकानावर काळे पडळ पोलिसांचा छापा; 103 गॅस सिलेंडर जप्त

Pune Crime News | Police raid black market shop selling domestic gas; 103 gas cylinders seized

पुणे : Pune Crime News |  दुकानामध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस धोकादायक पद्धतीने भरणार्‍यास काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले. दुकानातून १०३ गॅस सिलेंडर व टेम्पो असा १० लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

नितीन हनुमंत होळकर Nitin Hanumant Holkar (वय ३८, रा. हांडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हांडेवाडी परिसरामध्ये एक जण घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत आहे. ही बातमी पडताळून पाहिली, तेव्हा काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानाच्या बाजूला एक टेम्पो उभा होता. त्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ठेवलेले दिसून आले. 

पोलीस काव्या मल्टी सर्व्हिसेस या दुकानामध्ये गेले. तेव्हा तेथे एक जण धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरत होता. नितीन होळकर असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दुकान व टेम्पोमधील १०३ गॅस सिलेंडर, टेम्पो असा एकूण १० लाख ९ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे,  अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांनी केली आहे.

You may have missed