Pune PMC News | कारागृहातून ‘व्हिसी’द्वारे नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांची उपस्थिती (Video)

Pune PMC News | Corporators Lakshmi Andekar and Sonali Andekar's presence through 'VC' from prison (Video)

पुणे : Pune PMC News | आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातूनच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे महापालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थिती दर्शवली. त्यांच्या उपस्थितीची अधिकृत नोंद घेण्यात आली असून ती ग्राह्यही धरण्यात आली.

https://www.instagram.com/p/DXWbvEFic2T

प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नानापेठ) येथून निवडून आलेल्या या दोन्ही नगरसेविका सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी निवडणूकही तुरुंगातूनच लढवली होती. सभेत सहभागी होण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

न्यायालयाने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित राहण्यास परवानगी दिल्यानंतर त्यांनी सभेत सहभाग नोंदवला. नगरसचिव योगिता भोसले यांनी यासंदर्भातील माहिती सभागृहात दिली. त्यानंतर सभागृहाने याची दखल घेत त्यांच्या उपस्थितीला मान्यता दिली.

You may have missed