Pune Bibvewadi Accident | भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यु; बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर उलट्या बाजूने येणार्‍या वाहनामुळे झाला अपघात

Pune Accident News | Hit and Run Case in Khadakwasla; Four-year-old boy dies in car collision, drunk driver arrested

पुणे : Pune Bibvewadi Accident | थोड अंतर जाण्याऐवजी शॉटकट मारण्याच्या नादात अनेक जण उलट्या बाजूने जातात. या उलट्या जाण्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना बिबवेवाडी – कोंढवा रस्त्यावर शनिवारी सकाळी घडली. भरधाव टँकरने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वार चाकाखाली सापडून त्यात त्याचा मृत्यु झाला.

अनिल सिताराम आल्हाट (वय ४५, रा. भिमाले कॉम्पेक्स, संदेशनगर) असे अपघातात मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात बिबवेवाडी – कोंढवा रोडवरील कल्याण भेळ समोर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

मार्केटयार्ड पोलिसांनी टँकरचालक निलेश लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेतले आहे. हा टँकर राजू अकेला वॉटर सप्लायर्स यांचा असून मगतावर रामचंद्र राठी यांच्या मालकीचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर एक टेम्पो उलटा येत होता. त्याचवेळी पाण्याचा टँकर आणि दुचाकीस्वार जात होते. उलटा जात असलेला टेम्पो पाहून टँकरचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे दुचाकीस्वार टँकरखाली सापडून त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.

You may have missed