Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; झोपेतच कुऱ्हाडीने वार करून युवकाचा खुन

Crime News | Youth murdered on suspicion of having an immoral relationship; Youth murdered by stabbing with axe in his sleep

घाटंजी :  Crime News |  वडगाव जंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बोरीसिंह येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एका युवकाचा खून करण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रानुसार, मृतक आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय 22) याचे संशयित आरोपी पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) यांच्या पत्नीसोबत मागील अनेक वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचा दाट संशय होता. याच संशयातून संतप्त झालेल्या पतीने सदर युवकावर जीवघेणा हल्ला केला.

घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास मृतक आशिष घराच्या छतावर झोपलेला असताना   पांडुरंग कांबळे याने कुऱ्हाडीने गळ्यावर, पाठीवर आणि हातावर सपासप वार करत युवकाची निर्दयीपणे हत्या केली. या आधी आरोपीने चुकीच्या समजुतीतून आशिष ऐवजी त्याचा मोठा भाऊ शरद खंडूजी कांबळे (वय 29) याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला होता, हे विशेष. या हल्ल्यात शरद जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात खुन आणि खुन करण्याचा प्रयत्न करणे असे दोन गुन्हे आरोपी विरुद्ध दाखव करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या या घटनेत 22 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खुन करण्यात आला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे (API VIKAS DANDE) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You may have missed