API Suspended In Pune | पुणे : पोलीस नियंत्रण कक्षात न सांगता गैरहजर राहिलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले थेट निलंबित

API Suspended In Pune | Pune: Police Commissioner Amitesh Kumar directly suspended an Assistant Police Inspector who was absent from the police control room without informing.

पुणे : API Suspended In Pune |  पोलीस नियंत्रण कक्षात सीआरओ अधिकारी म्हणून कर्तव्यासाठी नेमलेले असताना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता, गैरहजर राहणार्‍या सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट निलंबित केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अभिजित प्रभाकर जाधव (API Abhijit Prabhakar Jadhav) असे या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांना ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस नियंत्रण कक्षात सीआरओ अधिकारी म्हणून कर्तव्यासाठी नेमलेले होते. त्यांनी कोणत्याही प्रकारे पूर्व कल्पना न देता, नेमून दिलेल्या कर्तव्यावर गैरहजर राहिले. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून महत्वाच्या घटनांबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यास विलंब झालेला आहे. सीआरओ अधिकारी म्हणून कर्तव्यावर नेमलेले असताना नेमून दिलेल्या कर्तव्यावर वेळेत हजर राहत नाहीत. तसेच काही एक पूर्व कल्पना न देता कर्तव्यावर गैरहजर राहता.

याबाबत वेळोवेळी वरिष्ठांनी समक्ष तोडी समज देऊनही त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे बेजबाबदार, बेफिकीर निष्काळजीपणाचे गैरवर्तन केलेले असल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांना निलंबित केले आहे.

You may have missed