Pune Crime News | पुणे : जमिनीचा ताबा घेण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण करणार्‍या बिल्डर विजय विठ्ठल निम्हण यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | Pune: Case registered against 5 people including builder Vijay Vitthal Nimhan for abusing and beating him to take possession of land (Video)

पुणे : गुंडांना आणून पाषाण येथील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करुन शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या बिल्डर विजय विठ्ठल निम्हण यांच्यासह ५ जणांवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुळ जमीन मालक जगन्नाथ गणपत दळवी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केल्यानंतर पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/reel/DXtKJKjCQzV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

विजय विठ्ठल निम्हण Vijay Vitthal Nimhan (रा. अभिमानश्री सोसायटी, पाषाण), अदवेत विलास निम्हण Advait Vilas Nimhan (रा. अभिमानश्री सोसायटी,पाषाण), अनविद गावडे (रा. चिंचवड), गौतम ओव्हाळ (रा. मुळशी), अन्वीत गावडे (रा. चिंचवड) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत किर्ती रामदास काळे (वय ४२, रा. काळे ईलाईट, पाषाण) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाण येथील नवीन बाणेर पाषाण लिंक रोड वरील क्रिस्टल गार्डनचे समोर २७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय विठ्ठल निम्हण हे बांधकाम व्यावसायिक असून ते विकासक म्हणून काम करतात. त्यांची व्ही ई निम्हण प्रमोटर अँड बिल्डर ही फर्म आहे.

पाषाण येथील शेत जमीन गट क्रमांक १३५/१ याबाबत जगन्नाथ गणपती दळवी (रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी पोलीस आयुक्तालयात याबाबत अर्ज दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, आपली वडीलोपार्जित क्षेत्र ३ हे ६० आर असून त्या मिळकतीमधील १२ फुटी रस्त्याच्या पश्चिमेस प्रत्यक्ष वहिवाटीचे क्षेत्र विजय विठ्ठल निम्हण व इतरांच्या वहिवाटीचे क्षेत्र आहे. आमच्या वापर वहिवाटीच्या क्षेत्रामध्ये अगरवाल यांचे एक एकर सोडुन उर्वरित शेत जमिनीचे आम्ही विद्यमान मिळकतधारक आहोत.

या मिळकतीच्या पूर्वेकडील मिळकत क्षेत्रावरती आमच्या वापर वहिवाटीमधील क्षेत्रावरती जिओ कंपनीचे टॉवर याबाबतची पुणे महानगर पालिकेकडे विठ्ठल एकनाथ निम्हण यांच्याकडून देण्यात आलेली होती. त्याबाबत शहानिशा करुनही महापालिकेकडून कारवाई झालेली नव्हती. तसेच ३६ मीटर रस्त्याच्या पश्चिमेकडील मिळकत क्षेत्रावरील प्रत्यक्ष वापर वहिवाटदार यांच्या वॉशिंग सेंटर, चिकनचे दुकान व इतर इत्यादी परवानगी विना चालू केलेले असल्याने ते खाली करण्यात यावे, याबाबत विठ्ठल एकनाथ निम्हण यांनी महापालिकेकडे हरकती अर्ज केलेले होते. व जिओ टॉवर काढून टाकण्याबाबत व मिळकतीमधील वॉशिंग सेंटर व इतर पत्रा शेडबाबत वारंवार तक्रारी व दमदाटी होत होती. त्यामुळे ऑक्टोंबर २०२५ मध्ये पोलीस आयुक्त तसेच स्थानिक पाषाण सुतारवाडी पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी दिवाणी न्यायालयात जाण्याची सुचना केली होती.

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता परवानगी विना असणारे बांधकाम पाडलेले आहे. त्यानंतर १ तासाच्या कालावधीत विजय विठ्ठल निम्हण, अदवेत विलास निम्हण, अन्वित गावडे यांच्याकडून महिला अंगरक्षकासह जवळपास १०० गुंडांना घेऊन येऊन जागेचा ताबा घेण्याच्या हेतूने आले. आमच्या परिवारातील लोकांना दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. यापुढे जागेवर आला तर हातपाय काढुन टाकू, महिला अंगरक्षकांनीही आम्हाला दमदाटी केलेली असल्याने केस करु, अशी धमकी दिली. तेव्हा ओम दळवी हे बालेवाडी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व पोलीस अधिकारी सानप जागेवर आले. त्यांनी संबंधित विजय विठ्ठल निम्हण व इतरांना जागेवरुन निघून जाण्यास सांगितले. जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता कारवाई केली जाईल, संबंधितांना समज देऊन हटवले. त्यांनी आम्हालाही सांगितले की, जागेवर तुम्ही बेकायदेशीर काही करावयाचे नाही, असे सांगून पोलीस अधिकारी निघून गेले.

त्यांच्या या प्रकारामुळे ते शेतजमिनीचा कधीही ताबा घेतील, कंपाऊंड करतील अशी भिती निर्माण झालेली आहे. त्यातून वादविवाद व आमच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी, असे अर्जात म्हटले होते. त्यानंतर बाणेर पोलिसांनी कारवाई करुन भा. न्या. संहिता १८९, १८९(२), (६), ३५१, ३५२, ३२९, ३ (५) या कलमाखाली मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करीत आहेत.

You may have missed