Pune Crime News | पुणे : गुटखा विक्रीसाठी वाहतूक करणार्‍या आरोपीला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ट्रकसह 80 लाखांचा गुटखा केला जप्त

Pune Crime News | Pune: Anti-narcotics squad arrests accused transporting gutkha for sale, seizes gutkha worth Rs 80 lakhs along with truck

पुणे : Pune Crime News |  पुण्यात ट्रक भरुन येणारा गुटखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर पकडला. ६० लाख २२ हजार ८०० रुपयांचा विमल गुटखा, २० लाखांचा ट्रक, मोबाईल असा ८० लाख ३२ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी ट्रकचालक श्रीशैल तम्माराव हाळके Srisail Tammarao Halke (वय ३२, रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे. पुण्यातील दोघा जणांनी पुणे शहरात विक्रीसाठी हा गुटखा मागविल्याचे निष्पन्न झाले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक आंबेगाव परिसरात गस्त घालत असताना २८ एप्रिल रोजी पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना पुण्यात गुटख्याचा ट्रक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कात्रज घाटात सापळा रचला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही मिळालेल्या खबरीप्रमाणे ट्रक दिसून आला नाही. तेव्हा पोलीस उलट्या दिशेने ट्रकचा शोध घेत सातार्‍याच्या दिशेने गेले. त्यावेळी खेड शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांना हा ट्रक दिसला. राजगड पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी तो ताब्यात घेतला. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा मागविणार्‍या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड, अक्षय शिर्के, आशा भिंगारे व राजगड पोलिसांनी केली आहे.

You may have missed