DG Medal News | Addl CP बसवराज तेली, ACP डॉ. विशाल हिरे, API प्रवीण स्वामी यांच्यासह पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 8 पोलीस अधिकार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

DG Medal News | Addl CP Basavaraj Teli, ACP Dr. Vishal Hire, API Praveen Swami along with 8 police officers of Pimpri Chinchwad Commissionerate announced the Director General of Police Medal of Honor

पुणे/ पिंपरी : DG Medal News | महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनाच्या पूर्व संध्येला पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीतील प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह ८ पोलीस अधिकारी, अंमलदारांचा सन्मान करण्यात आला आहे.

अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण शिवहार स्वामी, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आक्काप्प कोककेरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक अर्जुन महाजन, पोलीस हवालदार आशिष लक्ष्मण बोटके, पोलीस हवालदार संतोष पोपट शिंदे, पोलीस अंमलदार यामिनी उमेशराव ठाकरे यांना आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी हे सध्या पिंपरी चिंचवडमधील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण २६८ आरोपी अटक केले आहेत. २०२५ मध्ये २४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८४२ रुपये रिफंड मिळवुन दिला आहे, तर २०२६ मध्ये सायबर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यामधील ९ कोटी ५० हजार ३९ हजार २२२ रुपये रिफंड मिळवुन दिला आहे. गेल्या तीन वर्षातील ७८ गुन्ह्यांपैकी ६० गुन्हे उघडकीस आणले आहेत.

You may have missed