Pune Crime News । सदनिका बुक केल्यानंतरही ६ वर्षानंतर ताबा न दिल्याने वेंकटेश्वरा कन्स्ट्रक्शनचे संचालक संदिप नामदेव कासारसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News । आंबेगाव येथे ग्रँड प्रकल्पाची घोषणा करुन नागरिकांकडून पैसे घेऊन ६ वर्षानंतरही सदनिकांचा ताबा न देता जवळपास २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी वेंकटेश्वरा कन्स्ट्रक्शनच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

संदिप नामदेव कासार Sandip Namdev Kasar, नामदेव भैरु कासार Namdev Bhairu Kasar, किरण भानुदास पवार Kiran Bhanudas Pawar, रमजान हिदायतुल्ला शेख Ramzan Hidayatulla Sheikh (सर्व रा. अ‍ॅस्टोनिया रॉयल सोसायटी), रामभाऊ नामदेव कोंढरे Rambhau Namdev Kondhare ( रा. आंबेगाव) आणि सुनिल एकनाथ कोंढरे Sunil Eknath Kondhare (रा. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अमोल अनिल कुंभारकर (वय ३७, रा. वृदांवन सोसायटी, मानाजीनगर, नर्‍हे) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश्वरा कन्स्ट्रक्शन कंपनीने बाबजी पेट्रोल पंपच्या मागे द ग्रँड प्रकल्पाची घोषणा केली. त्यात बिल्डरव जागा मालक, भागीदार यांनी फिर्यादी यांनी सदनिका बुक करुन त्यांच्याकडून पैसे घेतले. सदनिकेचा ताबा दिला नाही. करारानुसार जानेवारी २०२३ पासून सदनिकेचे ताबा मिळेपर्यत दरमहा २० हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते. तेही पैसे फिर्यादी व इतर ५ जणांचे घरभाडे असे ५० लाख ४० हजार रुपये दिले नाही. फिर्यादी व इतर ५ जणांची १ कोटी ९१ लाख ८२ हजार ८५६ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करीत आहेत.

You may have missed