Pune Crime News | विषारी दारु प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर सीआयडीने केली मोक्का अंतर्गत कारवाई, हडपसर मधील घटनेत कारवाई

MCOCA

पुणे : Pune Crime News | विषारी दारु पिल्याने हडपसर व फुगेवाडी येथे २१ जणांचा मृत्यु झाला होता. ही विषारी दारु विक्री करणार्‍या ९ जणांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे Datta aka Bhau Bhivrao Londhe (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन), त्याचे साथीदार आकाश दीपक जाधव Aakash Deepak Jadhav (रा. हडपसर), योगेश राजेंद्र व्हनकडे Yogesh Rajendra Vhanakde (रा. मुंढवा), राधेशाम हरीराम प्रजापती Radhesham Hariram Prajapati (रा. उरुळी कांचन), कल्पेश अशोक अग्रवाल Kalpesh Ashok Agrawal (रा. खडकी), आर्यन संजीव धोत्रे Aryan Sanjeev Dhotre (रा. वडारवाडी), अभिषेक अरुण चौबे Abhishek Arun Chaube (रा. नवी मुंबई), अरुण जगदंबा चौबे Arun Jagdamba Chaube (रा. नवी मुंबई) आणि अंकित अरुण चौबे  Ankit Arun Chaube(रा. नवी मुंबई) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

टोळी प्रमुख दत्ता लोंढे याच्या टोळीकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याच्या सवयीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांमध्ये भितीचे, असुरक्षिततेचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टोळीने यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांनी नवी मुंबईतून रसायन मागवून ते गावठी दारुमध्ये मिसळल्याने ही विषारी दारु पिऊन हडपसर, काळेपडळ येथील ४ जणांचा मृत्यु झाला होता. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास शासनाने सीआयडीकडे सोपविला आहे. पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्फत गुन्हे अन्वेक्षण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे मोक्का प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाची छाननी करुन सुधीर हिरेमठ यांनी दत्ता लोंढे व त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी केली आहे.

You may have missed