Pune News | विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम; पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Pune News | Special drive to update students' Aadhaar biometrics; parents urged to cooperate

पुणे: Pune News | जिल्ह्यातील शाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत  करण्यासाठी ३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरावरून जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडील माहितीनुसार  जिल्ह्यातील ८ हजार ५३४ शाळांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील एकूण ३ लाख २४ हजार २७ विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रीक (MBU) अद्ययावत करणे प्रलंबित आहे.    या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये आधार शिबिरांचे आयोजन करणेत आलेले आहे. यावेळी ज्या विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रीक अद्ययावतीकरण प्रलंबित आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा प्रशासनानी पूर्वसूचना देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी, असे आवाहन आधार समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे यांनी केले आहे.

You may have missed