Lok JanShakti Party | लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शेलार, शहराध्यक्षपदी हरीभाऊ वडमारे तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी सुंदर कांबळे यांची निवड

Lok Janshakti Party | Prasad Shelar has been elected as district president of the Lok Janshakti Party (Ram Vilas) faction, Haribhau Vadmare as city president, and Sundar Kamble as Pimpri Chinchwad city president.

पुणे : Lok JanShakti Party |  लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाची पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील निमंत्रक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश प्रधान महासचिव प्रा. अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करणे आणि पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत पोहोचवणे यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

नियुक्त्यांनुसार, पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रसाद शेलार, पुणे शहराध्यक्षपदी हरीभाऊ वडमारे तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी सुंदर कांबळे यांची अधिकृत निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे म्हणाले, “पक्षाची ध्येयधोरणे आणि लोककल्याणकारी विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून पक्षसंघटन अधिक मजबूत करावे.”

या महत्त्वपूर्ण बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते धुराजी शिंदे, प्रदीप कांबळे, सविता रणदिवे, कविता राठोड, अरुण वाघमारे आणि भिसे यांच्यासह पुणे शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवड भागातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed