Mumbai-Pune Missing Link Accident | मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी (Video)

Mumbai-Pune Missing Link Accident | Horrific accident in the Mumbai-Pune Missing Link tunnel; one dead, one critically injured (Video)

पुणे: Mumbai-Pune Missing Link Accident |  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात रात्री भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरने त्याच दिशेने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.

https://www.instagram.com/p/Dbujh-1p7Hc

धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात वाकड येथील तुषार भूमकर (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अन्य तिघे सुखरूप बचावले.

हा अपघात रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. फॉर्च्युनरमधील पाचही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकडच्या भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवून जुन्या मार्गाने वळवण्यात आली. महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत पथक आणि मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

You may have missed